बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 1576

शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

नागपूर शहर व ग्रामीण आरोग्य विभागाचा घेतला आढावा                 

नागपूर,  दि. 16 :  नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना विषयक बाबींचा नागपूर शहर व ग्रामीण भागाचा आढावा घेतला.

आरोग्य यंत्रणेने सतर्क व सज्ज राहून कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत नागपूर शहरात 13478 रुग्ण असून त्यापैकी  3679  हे रुग्ण ग्रामीणचे आहेत. आतापर्यंत 6300 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण मृत्यू संख्या 461 असून 75 मृत्यू ग्रामीण तर शहरातील 326 मृत्यू व 60 हे बाहेर जिल्ह्यातील आहेत. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर 46.74% आहे. नागपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 12 डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु झालेले असून एकून 23 डेडीकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच) निश्चित करण्यात आले आहे. एकूण आयसोलेशन बेड 3215, ऑक्सीजन सपोर्टेड 2370 व 724 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त 34 डी.सी.एच. निश्चित करण्यात आले आहेत. डीसीएच मध्ये एकुण 446 व्हेंटिलेटरर्स आहेत. तसेच एकूण 51 कोविड केयर सेंटर निश्चित करण्यात आलेले आहेत. एकूण बेड संख्या 14428 आहे. सद्यस्थितीत 12 कोविड केयर सेंटर ग्रामीण व 5 कोविड केयर सेंटर महानगरपालिका  क्षेत्रात कार्यरत आहेत. तपासणीकरिता 7 शासकीय व 6 खाजगी प्रयोगशाळा सुरु असून  आतापर्यंत 114184  तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात आतापर्यत 27045 अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या असून 1485 पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली.

मनुष्यबळाची उपलब्धता व त्यांच्या मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांना वैद्यकीय महाविद्यालयात पदस्थापना  देण्याबाबात चर्चा झाली. मेडिकल आयसोलेशन  व तज्ज्ञ पुरवण्याबाबत चर्चा करावी, अशी मंत्री महोदय यांनी सूचना केली. या बैठकीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सेलोकर, डॉ.अविनाश गावंडे व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

*****

अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. 16 :- माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकनेते होते. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. संसदीय लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून त्यांनी राजकारण केलं. विरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल श्रद्धा, आदर होता. ते महान लेखक होते. पत्रकार होते. संवेदनशील कवी होते. त्यांचं नेतृत्वं, वक्तृत्व, दातृत्व असामान्य होतं. देशाच्या या सर्वकालीन महान नेतृत्वाच्या स्मृतिदिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन केलं आहे.

देशासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याची आवश्यकता – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 15 :- अनेक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या सारख्या असंख्य सेनानींनी भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून देशाला लोकशाही मिळाली. याची आपण सदैव जाणीव ठेवून देशाच्या विकासासाठी आपण प्रामाणिकपणे कटिबद्ध होत नागरिक म्हणून आपआपली कर्तव्यसुद्धा पार पाडली पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.  

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर श्रीमती दिक्षा धबाले, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, निमंत्रित गुणवंत विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.

देशाची एकता, सदृढ एकोपा, सलोखा राखण्याची मोठी जाबदारी आजच्या नवीन पिढीवर आहे. ही जबाबदारी पार पाडत असतांना आज विशेषत: कोरोनासारख्या महामारीला समोर जात असताना याचा खंबीरपणे मुकाबला आपण सर्वजण करीत आहोत. डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉइज, पोलीस, महसूल प्रशासनासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदाचा त्यांनी गौरव केला. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना सारख्या या प्रसंगाला अतिशय संयमाने आपण सर्व समोर जात आहोत. कोरोनातून अनेक जण मृत्यू पडले असले तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आगामी काळात आपण या कोरोनाच्या महामारीवर मात करुन पुन्हा एकदा आपले जनजीवन नियमित व सुरळीतपणे पार पाडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहिला आहे. परंतु कोरोनामुळे या सुविधेसाठी निधी देण्यासाठी कमतरता आली असली तरी या निधीतून आरोग्या सुविधा बळकट करुन सामान्य नागरिकांना गरजूला विनामूल्य दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. यात विविध रुग्णालयाचे अद्यावतीकरण करण्यावर आमचा भर आहे.  जिल्हा न्यायालयाची नवीन अद्ययावत इमारत उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. यासह जिल्ह्यातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न असून यामुळे अनेक कामांना गती मिळेल. यंदाचा पाऊस चांगला झाल्यामुळे विविध प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न तेवढा चिंतेचा राहिलेला नाही. बळीराजासह आपल्या सर्वांना ईश्वराने शक्ती देवो आणि या कोरोना सारख्या कठीन प्रसंगाला सामोरे जातांना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण यशस्वी होवो, या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यातील गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दहावीसाठी जिल्ह्यातून सन 2018-19 या वर्षी राष्ट्रीय स्तर परीक्षेत 19 विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता यातील 5 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यात नागार्जुना इंग्लिश स्कूल नांदेडचा तेजस विद्यासागर चेके, महात्मा फुले हायस्कुल नांदेडचा आदित्य गंगाधर बेळगे, ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूल नांदेडचा आनंद विश्वनाथ मठपती, ग्यानमाता विद्या विहार नांदेडचा हर्षवर्धन संजय जाजू, जिज्ञासा विद्यालय पुयणी नांदेडचा धीरजकुमार सदाशित पचलिंग या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

उद्योग घटकांना पुरस्काराचे वितरण

जिल्हा उद्योग केंद्र नांदेडच्यावतीने जिल्ह्यातील प्रगतशील उद्योजकांना चालना देण्याच्या उद्देशाने थकबाकीदार नसलेल्या यशस्वी उद्योजकांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा प्रथम पुरस्कार मे. साईकृष्णा फुडस एमआयडीसी नांदेड यांना देण्यात आला. याचे स्वरुप 15 हजार रुपये धनादेश स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. द्वितीय पुरस्कार मे. जनता इंडस्ट्रीज धर्माबाद यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये धनादेश, स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ असे  आहे.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून औषध विभागाच्या डॉ. स्वरुपा अरगडे, ईएनटी विभागातील डॉ. प्रशांत झाडे, कोरोना आजारावर मात करुन प्लाझ्मा दान केल्याबद्दल सामान्य रुग्णालयातील रेडीओलॉजिस्ट डॉ. राम मुसांडे, भगवान तुकाराम खिल्लारे, कोरोना आजारावर मात केलेले रुग्ण उपचार श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक रुग्णालयातील अशोक बच्चेवार, श्रीमती भाग्यश्री भालेराव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  

पाच पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

नांदेड पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात हे सन्मानचिन्ह देण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक देशमुख, पोलीस नाईक सुर्यकांत घुगे, मारोती केसगीर, शामसुंदर छत्रकर यांना ही सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर श्रीमती दिक्षा धबाले, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, निमंत्रितांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवा – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

 वाशिम जिल्हा शिक्षण विभागाचा आढावा

वाशिम, दि. १५ : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना विविध ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता दूरदर्शन, आकाशवाणी, यु-ट्यूब सारखी माध्यमे वापरली जात आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवावे, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या आढावा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, महिला व बाल कल्याण सभापती शोभाताई गावंडे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती गायकवाड म्हणाल्या, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळा सुरु करणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये, यासाठी ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. ई-संवादाच्या माध्यमांचा प्रभावी वापर करून शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, दूरचित्रवाणी संच, रेडीओ उपलब्ध नसेल, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा.

विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे शक्य नसले तरी शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशा गावामध्ये शिक्षकांनी स्वतःहून जाऊन ग्रामपंचायत सभागृह, मंदिर अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. काही जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी पुढाकार घेऊन गावातील मुलांना शिक्षण देत आहेत. अशा प्रकारचे उपक्रम वाशिम जिल्ह्यातही राबविण्याबाबत प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेने शिक्षक संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने याबाबत पुढाकार घ्यावा, अशा सूचना श्रीमती गायकवाड यांनी दिल्या. शिक्षण विभागातील रिक्त पदे, मोफत पाठ्यपुस्तक वितरण, आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया आदी विषयांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवा : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

चंद्रपूर,दि.15 ऑगस्ट: जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आवाक्यात आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा उत्तम असून जास्तीत जास्त चाचण्या कराव्यात अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आरोग्य विभागाचा कोरोना संदर्भातील आढावा घेताना ते बोलत होते.

कोरोना काळातील परिस्थिती लक्षात घेता समुदाय लागण होता कामा नये, याकडे विशेष लक्ष देण्याची गरच असल्याचे  सांगितले. मोठ्या प्रमाणात शहरी, ग्रामीण भागात सर्वेक्षण करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कोरोना संदर्भातील आढावा वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे दिनांक 15 ऑगस्टला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला. कोरोनाची जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सादर केली.

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बोलतांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात प्लाझमा डोनर कशा पद्धतीने तयार होतील यासाठी नियोजन करावे अशा त्यांनी सूचना दिल्या.

कोरोना संसर्ग काळात दुर्धर आजार असणाऱ्या नागरिकांकडे विशेषरित्या लक्ष देण्याची गरज आहे.दुर्धर आजार असलेल्या नागरिकांचे सर्व्हेशन करून मोठ्या प्रमाणात ॲन्टीजेन चाचणी करावी. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात औषधे मिळतील असे त्यांनी कोरोना विषयक आढावा बैठकीत सांगितले.

यावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर सोनारकर तसेच  वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

तत्पूर्वी, निर्माणाधीन नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. विविध आरोग्य सुविधा कशा प्रकारची असणार आहे. महाविद्यालयाचे बांधकाम, बांधकामासाठी लागणाऱ्या मजुरांची व्यवस्था, पुढील काळात कशा पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय नागरिकांच्या सेवेत असणार याविषयीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. नवीन होणाऱ्या महाविद्यालय बांधकामाविषयीच्या माहितीचे सादरीकरण प्रकल्प प्रमुख बिनोद कुमार यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ.एस.एस मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, प्रकल्प व्यवस्थापक अमसीद खोत, नियोजन व्यवस्थापक मनिष राठी, बाबासाहेब वासाडे उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात विशेष खबरदारी घेऊन बांधकामासाठी येणाऱ्या कामगारांना योग्य ती सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, स्थानिक कामगारांचा सहभाग वाढवावा अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. नियोजित वेळेत महाविद्यालय चंद्रपूरकरांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.                          

वाशिम जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणाला प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई

????????????????????????????????????

वाशिम, दि. १५ : सध्या जगभर कोरोना संसर्गाच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. कोरोनाच्या संकटातून जिल्ह्याला बाहेर काढण्यासोबतच आगामी काळात सर्व घटकांच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण ) तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.

यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, राजेंद्र जाधव, सुहासिनी गोणेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बाधितांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. वाशिम येथे लवकरच आरटी-पीसीआर प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. सध्या कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यात १७१० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास आणखी खाटांची संख्या वाढविण्याची तयारी आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ३ कोटी ३९ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील उपाययोजनांसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन, आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे ७ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, महसूल व इतर विभागानाचे अधिकारी, कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधासाठी लढत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. कोरोना प्रतिबंधासाठी सुरुवातीला टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला. या काळात गरजू व वंचित घटकांना रेशनच्या माध्यमातून एप्रिल ते जुलै या काळात एकूण ४१ हजार ९०६ मेट्रिक टन धान्य वितरण करण्यात आले. यापैकी २२ हजार ७६९ मेट्रिक टन धान्य हे नियमित योजनांमधील होते, तर १९ हजार ३४८ मेट्रिक टन अतिरिक्त धान्य वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या माध्यमातूनही गोरगरिबांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली. टाळेबंदी काळात शिवभोजन थाळीचा दर १० रुपयांवरून ५ रुपये करण्यात आला. एप्रिलपासून जुलै अखेरपर्यंत १ लक्ष ७५ हजार १३१ थाळी वितरीत करण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले.

कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कृषि विभागाच्या सहाय्याने थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात आला. सुमारे ६ कोटी ९७ लक्ष रुपये किंमतीचा २ हजार ७६७ मेट्रिक टन भाजीपाला, फळांची विक्री याकाळात विक्री झाली. टाळेबंदी काळात कृषि विभागामार्फत ६९० गावातील २८ हजार ७४९ शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आले. त्याची किंमत ४० कोटी २४ लक्ष रुपये इतकी होती. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे वाहतुकीवरील २६ लक्ष ३० हजार रुपयांची बचत झाली आहे.

शेतमालाची खरेदी-विक्री नियमित सुरु राहण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या सुरू होत्या. या काळात शासकीय आधारभूत किंमतीने १ लक्ष ९ हजार क्विंटल तूर आणि ८६ हजार ७५७ क्विंटल चना खरेदी करण्यात आला. जिल्ह्यात यंदा शासकीय खरेदी केंद्रांवर विक्रमी २ लक्ष ६९ हजार ७०५ क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे १३६ कोटी ६ लक्ष रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. त्यामुळे लॉक डाऊन कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी कर्जमुक्ती

नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्याठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार २१३ शेतकऱ्यांना ५३४ कोटी ८७ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. गतवर्षी परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि नैसर्गिक आपत्ती विभागाकडून एकूण ३५३ कोटी ६३ लक्ष रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश आले होते. त्यानुसार ८६ हजार ७१८ शेतकऱ्यांना ६१७ कोटी ६० लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण झाले आहे, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणार

शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. याकरिता वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या साठी जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच जिल्ह्यात ८ शेतकरी चेतना केंद्रांसाठी सुद्धा २ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात १ कोटी ६० लक्ष रुपये कृषि विभागास उपलब्ध करून दिले आहेत, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. पोहरादेवी विकास आराखड्याची कामे गतीने सुरु आहेत. मार्च २०२० अखेरपर्यंत ११ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी शासनाने नुकताच ७ कोटी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण रस्त्यांसाठी यंदा भरीव तरतूद

जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी गेल्या चार वर्षात मिळून १४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा एकाच वर्षात १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी गेल्या चार वर्षात मिळून १२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा एकाच वर्षात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

सर्वांना सोबत घेवून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार

कोरोनाच्या संकटातून जिल्ह्याला बाहेर काढून विकास कामांना गती द्यायची आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना सोबत घेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार करणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. तसेच सध्या जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. आपण सर्वजण सांघिकपणे प्रयत्न करून या संकटावर नक्कीच मात करू, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महिला व बाल विकास भवन कक्षाचे उद्घाटन

महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली

वाशिम, दि. १५ : जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर तयार करण्यात आलेल्या महिला व बाल विकास भवन कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज झाले. महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामुळे महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल, असे मत श्रीमती गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, महिला व बाल कल्याण सभापती शोभाताई गावंडे, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी, मदन नायक, महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य मीनाक्षी पट्टेबहादूर, श्रीमती मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कार्यालये एकाच धताखाली आणल्यास लाभार्थ्यांना लाभ घेणे सोयीचे व्हावे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरिकांना गैरसोय टाळता यावी, यासाठी जिल्ह्यात सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवरील महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे. याकरिता आगामी काळात जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरिता जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपात महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्यात आले असून याठिकाणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियमित कार्यालयीन वेळेत हे कार्यालय सुरू राहणार आहे. सर्व वयोगटातील महिला, मुलींसाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय यंत्रणा राबवित असलेल्या योजनांची माहिती, योजनांसाठी अर्ज कसा करावा? कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन या कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहुर्ले यांनी यावेळी दिली.

राज्यात कोरोनाच्या ३१ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आज दिवसभरात बरे झाले ६८४४ रुग्ण

मुंबई, दि.१५ : राज्यात आज ६८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,६१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२७,७१६) बरे झालेले रुग्ण- (१,०२,७४९), मृत्यू- (७०८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,५८१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१२,६३८), बरे झालेले रुग्ण- (८९,७९५), मृत्यू (३३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,५४२)

पालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)

रायगड: बाधित रुग्ण- (२३,००४), बरे झालेले रुग्ण-(१७,३२०), मृत्यू- (५७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५११०)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१५८२), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५७२), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२)

पुणे: बाधित रुग्ण- (१,२७,५१८), बरे झालेले रुग्ण- (८३,३०८), मृत्यू- (३१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०८०)

सातारा: बाधित रुग्ण- (७१८८), बरे झालेले रुग्ण- (४३०९), मृत्यू- (२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६२)

सांगली: बाधित रुग्ण- (६०८०), बरे झालेले रुग्ण- (३४९१), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३९३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३,३८४), बरे झालेले रुग्ण- (६२६९), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७७६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४,०३३), बरे झालेले रुग्ण- (८३३६), मृत्यू- (६२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७६)

नाशिक: बाधित रुग्ण- (२५,६६२), बरे झालेले रुग्ण- (१५,९३६), मृत्यू- (६६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०६६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५२२), बरे झालेले रुग्ण- (८७७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६१५)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७,३३९), बरे झालेले रुग्ण- (११,८०२), मृत्यू- (६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११७६), बरे झालेले रुग्ण- (७५४), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९)

धुळे: बाधित रुग्ण- (५१३४), बरे झालेले रुग्ण- (३२८०), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८,३३३), बरे झालेले रुग्ण- (१२,००१), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६२)

जालना: बाधित रुग्ण-(३००२), बरे झालेले रुग्ण- (१७६९), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२०)

बीड: बाधित रुग्ण- (२५४४), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२१)

लातूर: बाधित रुग्ण- (४९८२), बरे झालेले रुग्ण- (२२५४), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४०)

परभणी: बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (९७८), बरे झालेले रुग्ण- (६४८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३८२७), बरे झालेले रुग्ण (१७१६), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३४३२), बरे झालेले रुग्ण- (१६६२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८०)

अमरावती: बाधित रुग्ण- (३४४२), बरे झालेले रुग्ण- (२२४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११००)

अकोला: बाधित रुग्ण- (३२२९), बरे झालेले रुग्ण- (२५७३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

वाशिम: बाधित रुग्ण- (११६३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२३०२), बरे झालेले रुग्ण- (१३४९), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९२)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२००९), बरे झालेले रुग्ण- (१२३९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१२,८७३), बरे झालेले रुग्ण- (४७२६), मृत्यू- (३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०२)

वर्धा: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण- (२११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

भंडारा: बाधित रुग्ण- (४९२), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७६७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५१३), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५३८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९)

एकूण: बाधित रुग्ण-(५,८४,७५४) बरे झालेले रुग्ण-(४,०८,२८६),मृत्यू- (१९,७४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५६,४०९)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्यूंपैकी २२६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४३ मृत्यू ठाणे जिल्हा –२२, पुणे -८, नाशिक-३, रायगड -३, सांगली -२, पालघर-१,उस्मानाबाद-१,लातूर -१, जालना-१ आणि बुलढाणा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. आज जिल्हा आणि मनपा निहाय ३१ जुलै २०२०पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण  करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येतून ५९४ रुग्ण कमी झाले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

अजय जाधव..१५.८.२०२०

रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):-   ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या रानभाज्या ह्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त व पोषण मूल्य असलेल्या असून त्या नामशेष होऊ नयेत आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिक लाभ व्हावा, म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 52 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता.  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सूचित केले की, या रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचा उपक्रम स्वागतार्ह असून या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व महिला शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.

या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर्ले, प्रकल्प उपसंचालक सिताराम कोलते, सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि मधुकर पाटील, अमित उकडे, आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते.

रोहा ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण

रोहा ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते  डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.   

यावेळी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर्ले, प्रकल्प उपसंचालक सिताराम कोलते, सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव आणि मधुकर पाटील, अमित उकडे,  रोहा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते.

मापगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

ग्रुप ग्रामपंचायत मापगाव, ता.अलिबाग येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला.

यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार श्री.मधुकर ठाकूर, श्री.प्रवीण ठाकूर, श्री.सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, गट विकास अधिकारी, पं.स.,अलिबाग सौ.दीप्ती पाटील, मापगाव सरपंच श्रीमती अनिता थळे, ग्रामसमिती सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

अनाथ बालकांना शालेय साहित्याचे वाटप

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे भेट देऊन तेथील निराधार, आई-वडील नसलेल्या बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप केले. या बालग्राम मध्ये 157 विद्यार्थी आहेत. यावेळी पालकमंत्री महोदयांनी येथील बालकांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ,  संस्थेचे संचालक राकेश सिन्हा, सहाय्यक संचालक शिवरुद्र लुपने, व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

सर्व मिळून प्रयत्न करू या, कोरोनाला हरवू या! : पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी, नागरिकांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्य करीत कोरोना विषाणूची साखळी खंडित करावी. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास कोरोना विषाणूवर नक्कीच विजय मिळविता येईल, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), सुरेखा चव्हाण (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  

पालकमंत्री श्री. सत्तार आपल्या भाषणात पुढे म्हणाले,  गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूच्या महामारीने सर्वांनाच वेठीस धरले आहे. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या या विषाणूचा सामना करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. धुळे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यातून सुटलेला नाही. मात्र, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस प्रशासनाने त्याच्यावर नियंत्रण ठेवले आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवून भागणार नाही, तर त्याला संपूर्णपणे आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाठिशी राज्य शासन भक्कमपणे उभे आहे. कोरोना विषाणूबरोबर लढताना दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून लवकरच जनजीवन सुरळीत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, नगरविकास शाखा, पोलिस अधीक्षकांसह महसूल विभागास 11 कोटी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांनी स्थलांतर केले. त्यांना जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मदत केली. ते सुध्दा अभिनंदनास पात्र आहेत. कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यात एसटीच्या धुळे विभागाचे योगदान राहिले आहे. धुळे जिल्ह्यात अडकलेले नागरिक, रुग्णांना आपापल्या गावी किंवा रुग्णालयात औषधोपचारासाठी जाणाऱ्यांना एक लाखावर पास आपल्या प्रशासनाने वितरीत केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊनच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवभोजन योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. धुळे जिल्ह्यात 15 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून 2 लाख 20 हजार गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. याशिवाय विविध योजनांच्या माध्यमातून माहे एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत 25 हजार 483 टन गहू, 39 हजार 78 टन तांदूळ, 828 टन डाळीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना केले आहे. तसेच राज्य शासनाने आत्मनिर्भर योजनेंतर्गत ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, असे नागरिक, स्थलांतरीत, बेघर मजुरांना प्रती व्यक्ती मोफत पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

गेल्या वर्षी पीक विमा घेणाऱ्या  66 हजार 70 शेतकऱ्यांना तब्बल 97 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला. आपल्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून  42 हजार 470 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 321 कोटी 67 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील 35 हजार 190 शेतकऱ्यांना 275 कोटी 15 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे. धुळे जिल्ह्यातील 14 हजार 352 शेतकऱ्यांकडील 4 लाख 56 हजार 555 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. याशिवाय 2 लाख 70 हजार क्विंटल मका, 44 हजार 464 क्विंटल ज्वारी, 14 हजार 846 क्विंटल तूर आणि 1 लाख 41 हजार क्विंटल हरभराची खरेदी पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे बाधित  2 लाख 78 हजार 167 शेतकऱ्यांना 244 कोटी 87लाख 6 हजार 75 रुपयांच्या अनुदानाचे वाटप केले आहे. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 73 कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 4 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. त्यात 2 लाख 39 हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झालेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 2 लाख 50 हजार 944 शेतकऱ्यांचा डाटा संबंधित पोर्टलवर अपलोड केला आहे. त्यापैकी 2 लाख 699 एवढ्या शेतकऱ्यांचा डाटा पीएफएमएसने स्वीकृत केला आहे. त्यापैकी 1 लाख 80 हजार 225 शेतकऱ्यांना पहिला हप्ता, 1 लाख 74 हजार 262 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता, 1 लाख 58 हजार 890 शेतकऱ्यांना तिसरा हप्ता, 1 लाख 33 हजार 295 शेतकऱ्यांना चौथा हप्ता, तर 55 हजार 790 शेतकऱ्यांना पाचवा हप्ता अशाप्रकारे अनुदान वाटप केले आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना 1 लाख 79 हजार 223 दाखल्यांचे वाटप केले आहे, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या ‘कोरोना’ योध्द्यांचा पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. प्रमुख सत्कारार्थींची नावे अशी : डॉ. हितेंद्र देशमुख, आरोग्य सेविका सखूबाई बागूल, आरोग्य सेवक शरद खैरनार, आशा कार्यकर्त्या मनीषा कृष्णराव मराठे, अंगणवाडी कार्यकर्त्या तुळसाबाई कृष्णा पाटील, परिचर अभिषेक सुनील गायकवाड, नाझीम बेग रहिम बेग मिर्झा (सर्व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद). डॉ. विशाल पाटील, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. ध्रुवराज वाघ, डॉ. अर्जुन नरोटे, दीपाली मोरे, तृप्ती आरोळे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अभय शिनकर, तुषार प्रमोद पवार (कै. प्रमोद पवार यांचे पुत्र), रशीद अन्सारी (सर्व जिल्हा रुग्णालय). डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. दीपक शेजवळ, गणेश वाघोरे, विद्या गुडवाल, सुहासिनी गावित, संतोष चौधरी, विजय सारवान, राजरत्न अहिरे (सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय). डॉ. एम. आर. शेख, डॉ. प्रशांत मराठे, मनोहर सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, भरत येवलेकर, विकास सावळे, इफ्तेखार उस्मान, मुन्ना मन्वर, प्रियांका वसावे, नीता चौधरी (सर्व महानगरपालिका आरोग्य विभाग). अनुप अग्रवाल, राजेंद्र वालचंद शिंदे, राजेंद्र बंब, शाहबाज फारूख शाह, जी. एम. धनगर, धनंजय सोनवणे, योगेश राऊत, कुमारपाल कोठारी (स्वयंसेवी व्यक्ती, स्वयंसेवी संघटना, संस्था). डॉक्टर क्लब शिरपूर, दोंडाईचा, बी. व्ही. पाटील (शिरपूर), तुषार पवार (शिंदखेडा). सचिन शालिकराव साळुंखे सहाय्य पोलिस निरीक्षक (थाळनेर पोलिस ठाणे), ज्ञानेश्वर झिंगा पाटील (हवालदार). डॉ. गिरीश ठाकरे, आसिफ दौलत पटेल (कोरोना विषाणूवर मात). कृष्णा राठोड (जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरिक क्षेत्र, धुळे) यांचा समावेश आहे. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.     

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे ऑनलाइन उदघाटन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील नवीन इमारतीत अतिदक्षता विभागातील 55 व 60 ऑक्सिजनयुक्त बेड, शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथील ऑक्सिजनयुक्त 50 बेड, अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड हेल्थ सेंटर, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयातील 100 बेड ऑक्सिजनयुक्त कोविड हेल्थ सेंटरसह महिला व बालविकास भवनचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा रुग्णालयात उदघाटन

जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने उभारलेल्या आणि महानगरपालिका, धुळे संचलित डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजनयुक्त 60 बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज सकाळी झाले. यावेळी आमदार कुणाल पाटील, आमदार श्रीमती गावित, जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथ सी., पोलिस अधीक्षक श्री. पंडित, महानगरपालिका आयुक्त श्री. शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी कोविड सेंटरची पाहणी करून विविध सूचना केल्या.  त्यानंतर पालकमंत्री श्री. सत्तार यांनी अजमेरा आयुर्वेद रुग्णालयातील कोविड हेल्थ केअर सेंटरला भेट देवून तेथील खासगी प्रयोगशाळेची पाहणी केली.

जवाहरकोविड हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन

जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोविड हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त 100 बेड आहेत. यावेळी फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी कोविड सेंटरची पाहणी केली.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रीय छात्रसेनेच्या जवानांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. अपर तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार बी. बी. पावरा यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...