मुंबई, दि. १७ – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेचे तालिका सभापती जाहीर केले. सदस्य सर्वश्री ॲड. निरंजन डावखरे, अरुण लाड, राजेश राठोड, नरेंद्र दराडे यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये विधानसभा सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावार, यशवंत माने, अमित झनक यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
00000