‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांची मुलाखत

0
9

मुंबई, दि. 18 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

राज्यातील उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा या उदात्त हेतूने राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि कोल्हापूर याठिकाणी केंद्र सुरू आहेत. तेथे प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. या प्रशिक्षणाचे स्वरूप, निवड प्रक्रिया अशा महत्वपूर्ण विषयांवर राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.19 आणि गुरुवार दि. 20 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here