‘दिलखुलास’ कार्यक्रमात कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांची दि. २६, दि. २७ जुलैला मुलाखत

0
11

मुंबई दि. २५ : कांदळवने वाढावी म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत. ही झाडे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असून नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणून कार्य बजावतात. कांदळवनाचे महत्व लक्षात घेवून त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमातून राज्याच्या कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी केले आहे.

कांदळवने हे सागरी परिसंस्थेचा महत्वाचा स्त्रोत असून त्यास पर्यावरणीयदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्व आहे. राज्याचा एकूण 720 कि.मी. लांबीचा सागरी किनारा खारफुटी वनस्पती तसेच इतर जैवविविधतेने नटलेला आहे. या कांदळवनांच्या जतन व संवर्धनासाठी जागतिकस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिवस साजरा केला जातो. कांदळवनांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत कोणते धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, तसेच कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार २६ आणि गुरूवार २७ जुलै२०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here