मुंबई, दि.28: व्याघ्र संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनासाठी जगभरातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी याअनुषंगाने दरवर्षी २९ जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे.
राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. या दिनानिमित्त वाघांना तसेच इतर वन्य प्राण्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, वाघांची शिकार आणि बेकायदेशीर व्यापार, मानव-वन्यजीव संघर्ष तसेच त्यांचा नैसर्गिक अधिवास टिकवून ठेवण्यासाठी शासनस्तरावर कशा प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे, अशा विविध विषयांवर डॉ. रामगावकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 29 आणि सोमवार दि.31 जुलै, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक संगीता लोखंडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000