राज्यातील कोणताही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट नाही

0
5

मुंबई, दि. १ : पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही व रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रेड अलर्ट हा जर २४ तासात २०४ मिमी पाऊस पडला तर  देण्यात येतो. कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला नाही. ऑरेंज अलर्ट हा जर २४ तासात ११५ ते २०४ मिमी पाऊस पडला, तर देण्यात येतो.  रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

येलो अलर्ट हा २४ तासांत ६५ ते ११५ मिमी पाऊस पडला तर देण्यात येतो. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

ग्रीन  अलर्ट हा ६५ मिमी पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. वरील सर्व जिल्हे वगळून हा अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील या धारणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग हा सामान्य पातळीचा आहे

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची एकूण क्षमता ७४०.१७  दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३२४.३२ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे.  जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची एकूण क्षमता २५५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५२८ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ३०४.१० दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत २३.७० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाची एकूण क्षमता २०२.४४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.  सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी धरणाची एकूण क्षमता ११२.१४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची एकूण क्षमता २१९.९७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६१ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची एकूण क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ९३ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला धरणाची एकूण क्षमता १८३.९४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणाची एकूण क्षमता १६९.६७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १९.५० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणाची एकूण क्षमता २१६.८७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १७.२५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाची एकूण क्षमता ७७९.३४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६९ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना व नजीकच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत.

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी भरतीच्या लाटांचा तपशील

दुपारी १२:३४, ४.८४ मीटर

वज्राघात प्रवण जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “दामिनी: लाइटनिंग अलर्ट ॲप” डाउनलोड व  इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटरच्या परिसरातील विजेसाठी जीपीएस नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयच्या खबरदारीचे उपाय देखील सामायिक करते.

नागरिकांनी आपत्तींच्या चेतावणी आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET ॲप” डाउनलोड व इन्स्टॉल करावे. राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून  १ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ७:०० वाजता प्राप्त आकडेवारी नुसार  महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here