भटक्या – विमुक्त समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
4

मुंबई दि.२ : भटक्या व विमुक्त समाजाच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भटक्या- विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज विधानभवन येथे झाली.

बैठकीला इतर मागास व बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भटके- विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींमार्फत विविध प्रश्न मांडण्यात आले. यात शैक्षणिक प्रश्न, घरांची उपलब्धता यासह भटके- विमुक्त समाजातील लोककलावंतांच्या अडचणींची माहिती देण्यात आली. महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लोककला जोपासणाऱ्या लोककलावंताना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधन ५ हजार करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले.

0000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here