सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नामाधिकरण – मंत्री हसन मुश्रीफ

0
7

मुंबईदि. ९ : सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयसातारा या संस्थेचे ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयसातारा’ असे नामाधिकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली .

सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  संस्थेचे नामाधिकरणाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून त्यानुषगांने आवश्यक ती कार्यवाही आयुक्तवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई  करीत असल्याचे मंत्री श्री मुश्रीफ यांनी सांगितले .

000

राजू धोत्रे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here