अल्पसंख्याक विकास आयुक्तालयाबाबतचा प्रस्ताव तयार करावा – अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार

मुंबईदि. ९ : अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या योजना अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचविण्यासाठी अल्पसंख्याक विकास आयुक्तालय उभारण्याचे  शासनाच्या विचाराधीन असून याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करावाअसे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

आज मंत्रालयात मंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनउपसचिव मो.बा. ताशिलदार उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार म्हणालेअल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाहीयाची दक्षता घेण्यात यावी. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ व विभागातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात आढावा घेवून पदे तत्काळ भरण्याबाबत कार्यवाही करावीअसे निर्देश संबंधितांना मंत्री श्री. सत्तार यांनी दिले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/