बंदरे विभागांतर्गत कामे गुणवत्तापूर्वक व गतीने पूर्ण करावीत – मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. 10 : बंदरे विभागांतर्गत सागरी मंडळ व शासन स्तरावरील प्रलंबित कामे गुणवत्तापूर्वक व जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

बंदरे विभागांतर्गत कामांचा आढावा मंत्री श्री. बनसोडे यांनी आज मंत्रालयात घेतला, यावेळी ते बोलत होते. बैठकीस बंदरे विभागाचे सचिव पराग जैन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री बनसोडे म्हणाले की, बंदरे विभागाला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४४३ कोटी निधीचा वापर करण्यात यावा. प्रकल्पास प्रशासकीय मान्यता घेऊन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. ‘बंदरे विकास धोरण २०२३’ च्या अनुषंगाने रेडिओ क्लब, मुंबई येथे प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारत व तत्सम सुविधा उभारण्याच्या कामाला गती द्यावी. तसेच, कामांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. प्रलंबित कामांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.बनसोडे यांनी यावेळी दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/