‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

       नवी दिल्ली, 11 : केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी  प्रदान केला जाणारा राष्ट्रीय ‘गोपाल रत्न पुरस्कार’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नॅशनल अवॉर्ड पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज  15 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

दूध उत्पादक शेतकरी, दूग्ध सहकारी संस्था, दूध निर्मिती कंपनी (एमपीसी), दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कार केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने प्रदान केला जातो. यासाठी इच्छुकांनी  https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध व्हावी, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त असून त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये  महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर 2014 मध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ अभियान’ (आरजीएम) सुरु करण्यात आले. या अंतर्गत देशी गायी- म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जाते.

वर्ष 2023 या वर्षासाठी  विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे), सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध निर्मिती कंपनी (एमपीसी)/दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना (एफपीओ), सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) अशी श्रेणी केली आहे.

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 प्राप्त पहिल्या दोन विभागांसाठी म्हणजेच सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/ एफपीओ/ एमपीसी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाईल. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.5,00,000/- (पाच लाख रुपये) तर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी  रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) पारितोषिक दिले जाईल.

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) विभागासाठी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या पुरस्कारामध्ये केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह  यांचा समावेश असेल. राष्ट्रीय दुग्ध दिवसाचे औचित्य साधून  26 नोव्हेंबर 2023 रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता आणि  ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी  https://awards.gov.in  किंवा  https://dahd.nic.in संकेतस्थळांना भेट द्यावी.

 

गायींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

 

S.N.

Breed

Home Tract

1 Amritmahal Karnataka
2 Bachaur Bihar
3 Bargur Tamilnadu
4 Dangi Maharashtra and Madhya Pradesh
5 Deoni Maharashtra and Karnataka
6 Gaolao Maharashtra and Madhya Pradesh
7 Gir Gujarat
8 Hallikar Karnataka
9 Hariana Haryana, Uttar Pradesh and Rajasthan
10 Kangayam Tamilnadu
11 Kankrej Gujarat and Rajasthan
12 Kenkatha Uttar Pradesh and Madhya Pradesh
13 Kherigarh Uttar Pradesh
14 Khillar Maharashtra and Karnataka
15 Krishna Valley Karnataka
16 Malvi Madhya Pradesh
17 Mewati Rajasthan, Haryana and Uttar Pradesh
18 Nagori Rajasthan
19 Nimari Madhya Pradesh
20 Ongole Andhra Pradesh
21 Ponwar Uttar Pradesh
22 Punganur Andhra Pradesh
23 Rathi Rajasthan
24 Red Kandhari Maharashtra
25 Red Sindhi On organized farms only
26 Sahiwal Punjab and Rajasthan
27 Siri Sikkim and West Bengal
28 Tharparkar Rajasthan
29 Umblachery Tamilnadu
30 Vechur Kerala
31 Motu Orissa,Chhattisgarh and Andhra Pradesh
32 Ghumusari Orissa
33 Binjharpuri Orissa
34 Khariar Orissa
35 Pulikulam Tamilnadu
36 Kosali Chhattisgarh
37 MalnadGidda Karnataka
38 Belahi Haryana and Chandigarh
39 Gangatiri Uttar Pradesh and Bihar
40 Badri Uttarakhand
41 Lakhimi Assam
42 Ladakhi Jammu and Kashmir
43 Konkan Kapila Maharashtra and Goa
44 PodaThurpu Telangana
45 Nari Rajasthan and Gujarat
46 Dagri Gujarat
47 Thutho Nagaland
48 Shweta Kapila Goa
49 Himachali Pahari Himachal Pradesh
50 Purnea Bihar
51 Kathani Maharashtra
52 Sanchori Rajasthan
53 Masilum Meghalaya

म्हशींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

 

Sr. No Breed Home Tract
1 Bhadawari Uttar Pradesh and Madhya Pradesh
2 Jaffarabadi Gujarat
3 Marathwadi Maharashtra
4 Mehsana Gujarat
5 Murrah Haryana
6 Nagpuri Maharashtra
7 Nili Ravi Punjab
8 Pandharpuri Maharashtra
9 Surti Gujarat
10 Toda Tamilnadu
11 Banni Gujarat
12 Chilika Orissa
13 Kalahandi Odisha
14 Luit (Swamp) Assam and Manipur
15 Bargur Tamil Nadu
16 Chhattisgarhi Chhattisgarh
17 Gojri Punjab and Himachal Pradesh
18 Dharwadi Karnataka
19 Manda Odisha
20 Purnathadi Maharashtra

 

00000