मुंबई, दि. १७ : स्वनाथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी राहत आहे या संस्थेने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
चेंबूर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट येथे स्वनाथ फाऊंडेशन तर्फे ‘प्रत्येक बालकाला हक्काचा परिवार‘ या विषयी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत जिल्हा संयोजकांकरिता आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापक तथा अध्यक्षा श्रेया भारतीय, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश मोध, स्वनाथ फाऊंडेशनचे विश्वस्त गगन मेहता, सारिका मेहता आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, स्वनाथ फाऊंडेशनने कमी कालावधीत अनाथ बालकांसाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. शासनाकडून या कामासाठी सहकार्य करण्यात येईल. अशा प्रकारे सेवा भावी संस्था समाजात काम करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. याबाबत स्वयंसेवी संस्थाकडून काही सूचना आल्या, तर शासन त्यावर उपाययोजना व नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी काम करेल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
००००
संध्या गरवारे/विसंअ/