‘वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गा’च्या कामाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

मुंबई, दि. २३ :- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वांद्रे- वर्सोवा सागरी मार्गाच्या कामाची पाहणी वांद्रे येथे  केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता  सुनील भुतडा, कार्यकारी अभियंता  नितीन बोरोले व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री श्री. भुसे यांनी वांद्रे – वर्सोवा सागरी महामार्ग, जुहू जोडणी रस्ता,  वर्सोवा जोडणी रस्ता, वांद्रे येथील जेट्टी बांधकामाची माहिती घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामाचे टप्पे करून प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, त्यानुसार कामाचे नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ/