परदेश अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ लंडनमध्ये दाखल; उच्चायुक्तांबरोबर अभ्यास भेटीत विविध विषयांवर चर्चा

लंडन / मुंबई दि. ३१ :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनीनेदरलँड्सलंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यास दौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या करीत आहेत. आजपासून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. लंडन येथील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांची शिष्टमंडळाने अभ्यास भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळातील विधिमंडळ सदस्यविधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते. उच्चायुक्त श्री. दोरायस्वामी यांनी ब्रिटनमधील शिक्षण व्यवस्थाकृषी प्रक्रिया उद्योगप्रगत तंत्रज्ञानपर्यावरण संरक्षणासंदर्भातील कायदेग्रीन एनर्जीपवनचक्की प्रकल्पउद्योगमहिला सबलीकरणमहिला अत्याचारालाप्रतिबंध होण्यासाठीचे कायदे इत्यादीबाबत सादरीकरणाव्दारे विस्ताराने माहिती दिली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी अनुक्रमे उद्योगवाढीसंदर्भातील ब्रिटनमधील ध्येयधोरणेमहिलाहक्क आणि संरक्षणासंदर्भातील कायदेउपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील सदस्यांनी भाग घेतला. उच्चायुक्त श्री. दोरायस्वामी आणि मान्यवरांचा उभयतांच्या हस्ते शाल आणि गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ उद्या शुक्रवार१ सप्टेंबर२०२३ रोजी राष्ट्रकुल संसदीय मंडळमुख्यालयलंडन येथे (Commonwealth Parliamentary Association) महासचिवांची (Secretary General) अभ्यासभेट घेणार आहे. शनिवार२ सप्टेंबर२०२३ रोजी सकाळी ११ वाजता लंडनमधील महाराष्ट्र मंडळाबरोबर भेट आयोजित करण्यात आली आहे. सोमवार४ सप्टेंबर२०२३ रोजी अभ्यासदौऱ्यावरील  शिष्टमंडळ मुंबईत परत येईल.