विमानतळाच्या आजुबाजूला मुक्त उड्डाणक्षेत्रात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडवण्यास २१ ऑक्टोबरपर्यंत बंदी

मुंबई, दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जीत करणारी वस्तू, पतंग आदींना बृह्न्मुंबई क्षेत्रात 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

कोणत्याही विमानाच्या लॅंडींग, टेक ऑफ आणि आवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशाप्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलीस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन त्यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.

०००००

निलेश तायडे/विसंअ