आदिवासी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आश्रमशाळेत आदिवासी भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
2

            मुंबई‍‍दि. ०५ : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे. आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन  होवून ही भाषा शब्दकोशांच्या माध्यमातून जतन व्हावी म्हणून बोलीभाषांचे शब्दकोश शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

            मंत्रालयात मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी भाषेतील शब्दकोश प्रमाणित करण्याबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यासआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडउपसचिव विजेंद्रसिंग वसावेराईज फाऊंडेशन संस्थेचे ऋषिकेश खिलारे उपस्थित होते.

            मंत्री डॉ. गावित म्हणाले कीशासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात कोरकूपावराभिलालाकोलामकातकरीगोंडपारधीप्रधान या आठ भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देण्यात यावेत. पुढील टप्प्यात उर्वरित आदिवासी भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी धोरण निश्चित करावे. याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

            राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात आगामी काळात पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेत शिक्षण देण्याचा मानस आहे. राईज फाऊंडेशन ही संस्था आदिवासी बोली भाषेचे भाषिक संशोधन करण्याचे काम करते. या संस्थेने आदिम भाषेतील शब्द व संकल्पनांचा शब्दकोश तयार केला आहे. हा शब्दकोश आयुक्त कार्यालयाने शिक्षण विभागाकडून प्रमाणित करून घ्यावा. तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले बालभारतीच्या पुस्तकांचे आदिवासी बोलीभाषेत भाषांतर करून  शासकीय आश्रमशाळांना उपलब्ध करून द्यावेत. तसेच आयुक्त कार्यालयाने ध्वनीचित्रफित स्वरूपात आदिवासी बोलीभाषेतील शिक्षणसामग्री उपलब्ध करून द्यावीअसेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

*****

 

शैलजा पाटील/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here