राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

ठाणे, दि. २ (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात  आमदार भरत गोगावले, तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनीही अभिवादन केले.

000