मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
000