समस्या सोडविण्यासाठी दर बुधवारी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर नागरिकांशी सुसंवाद साधणार

मुंबई, दि. ३ – मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. यासाठी ते मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दुपारी १ ते ४ या वेळेत उपस्थित राहणार आहेत.

या अनुषंगाने मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकासकामे याबाबतच्या सूचना तसेच इतर समस्या असल्यास उद्या बुधवार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याबाबतच्या निवेदन अथवा लेखी अर्जासह उपस्थित राहावे. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच इतर विषयांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहता येईल, असे आवाहन पालकमंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे. ज्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असल्यास पालकमंत्री गुरुवारी उपलब्ध राहतील.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/