मुंबई, दि. ३ : सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. महानवर यांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन सत्कार केला आणि अभिनंदन केले.
यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील यांनी कुलगुरू श्री.महानवर यांच्याशी विद्यापीठ आणि प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक कारकीर्द याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. महानवर मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते.