राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दिल्या शुभेच्छा

सांगली दि. 13 (जि.मा.का.) :      श्री संत तुकाराम महाराज वाङमय संशोधन मंडळ, गाथा मंदिर देहू येथे आयोजित 16 व्या राज्यस्तरीय  कामगार भजन प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात कामगार मंत्री डॉ. खाडे सांगली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.

इंद्रायणीच्या तीरावर गाथा मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे १६ वे राज्यस्तरीय भजन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले याचा मनस्वी आनंद आहे. गाथा मंदिर देवस्थान ट्रस्टने या शिबिरासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन शिबिराच्या सर्व सत्रांसाठी अतिशय उत्तम वक्ते आणि मार्गदर्शक उपलब्ध करून दिले. गाथा मंदिराचे संस्थापक गुरूवर्य हरी भक्त परायन पांडुरंग महाराज घुले यांनी स्वतः उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या या कामगारांना मार्गदर्शन केले याबद्दल कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी ट्रस्टचे आभार मानले.