महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. १४, १६ आणि १७ ऑक्टोबरला मुलाखत

0
17

मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी राज्यभरात शासनस्तरावर “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी केली जाते. या दिनानिमित्ताने युवा पिढीत वाचन संस्कृती रुजावी, वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच वाचकांसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांची राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी व नियोजन करण्यात येत आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 14, सोमवार दि. 16 आणि मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीकांत चौगुले यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here