राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे मुंबईत १७ ऑक्टोबरला सुनावणी

मुंबई, दि. १३ :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे महाराष्ट्रातील प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मंगळवार, दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मुंबइतील सह्याद्री अतिथीगृह येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या संघटनांच्या पाच ते सहा सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यांसह सुनावणीस उपस्थित रहावे, असे सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी कळविले आहे.

राज्यातील लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, सैन, किराड, भोयर पवार, सूर्यवंशी गुर्जर, बेलदार, झाडे, डांगरी व कलवार या जाती समूहांचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ