श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचे १०० कोटी विजयादशमी पूर्वी येतील – पालकमंत्री हसन मुश्रीफ

0
8

कोल्हापूर, दि.16 : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचे 100 कोटी दसऱ्यापूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र आराखड्यामध्ये आवश्यक काही बदल करण्यासाठी बैठक संपन्न झाली. 

मंदिर परिसरातील विकास आराखडा अंतर्गत व्हिनस चित्रपटगृहजवळ बहूमजली वाहनतळ व भक्त निवास बांधणे कामासाठी प्रशासकीय मान्यता रक्कम रूपये 42.16 कोटी निधी मंजूर आहे. तथापि सदर जागेत जलसंपदा विभागाने दिलेल्या नकाशानूसार ती जागा निळ्या पुररेषेत आहे. त्या ऐवजी सदर ठिकाणी फक्त बहूमजली वाहनतळ इमारत बांधणे शक्य असल्याने त्यासाठी रू.26.37 कोटी निधीची आवश्यकता असल्याचे आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. त्यामुळे  व्हिनस चित्रपटगृहाजवळील भक्त निवास पुररेषेमुळे रद्द करून त्या ऐवजी आता सरस्वती चित्रपटगृहाजवळ बहूमजली वाहनतळ इमारत होणार आहे. नवीन बदलाबात सादरीकरणात माहिती दिली. यासाठी अजून निधी प्राप्त झालेला नसून डिएसआर बदलल्यामुळे 79.96 कोटी रूपयांचा आराखडा आता 100 कोटींच्या वरती जाईल यावर बैठकीत चर्चा झाली. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या आठवड्यात मी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवरात्र उत्सवामध्ये हे पैसे प्राप्त व्हावेत अशी मागणी केली होती.या विजयादशमी पर्यंत निधी प्राप्त करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत असे ते पुढे म्हणाले. या बैठकीला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महानगरपालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, अतिरीक्त आयुक्त रवीकांत आडसूळ यांच्यासह इतर विकास आराखडा समिती सदस्य उपस्थित होते.

यानंतर झालेल्या बैठकीत विमानतळ भूसंपादनाच्या अनुषंगाने चर्चा झाली. या प्रक्रियेत ज्यांनी स्व:ता जमीन संपादनला प्रतिसाद दिला नाही. आता ती मुदत संपली आहे. परंतू आता तेथील संबंधितांनी मुदतवाढ मागीतली आहे अशी चर्चा झाली. त्यानूसार यावर दोन महिने मुदत वाढविल्यानंतर सर्व आक्षेप दूर होवून प्रश्न मिटतील असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्याची मुदत सप्टेंबर अखेर आहे, ती नोव्हेंबर अखरे वाढवावी अशी मागणी केली जाणार आहे. आंबेओहळाच्या प्रकल्पचा पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून 36 हेक्टर जमीन वाटप करण्याची राहिली आहे. अनेकांचे व्यक्तीगत प्रश्न मार्गी लागले आहेत. आंबेओहळ प्रकल्पाचे 100 टक्के पुनर्वसन पुर्ण होण्यासाठी त्यांनी बैठकीत सूचना केल्या. जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन पाटील यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामासाठी पालकमंत्री यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी राहूल रेखावार, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा पाटील, प्रांत हरिश धार्मिक, गडहिंग्लज प्रांत बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.

यानंतर इचलकरंजी शहर नगर रचना योजना क्रमांक एक व दोन मधील मिळकतीचे व्हेरिएशन कामी मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी मधील अडचणी दूर करून योजना कार्यान्वित करणे बाबत बैठक झाली. यावेळी त्यांनी दुरुस्तीबाबत प्रकरण दाखल करा अशा सूचना दिल्या. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपस्थित होते.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here