यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

मुंबई दि. 9 : यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथे नवीन पोलिस ठाणे बांधणे, राज्य परिवहन विभागाच्या यवतमाळ विभागातील दारव्हा, दिग्रस आणि नेर येथील बसस्थानक बांधण्यायासह विविध विकास कामांचा आढावा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात येथे घेतला. यावेळी गृह, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. राठोड म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांचे नियोजित सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावीत. दारव्हा, दिग्रस आणि नेर येथे बसस्थानक बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. एसटी महामंडळाला जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत, इतर प्रश्नांबाबत मंत्री श्री. राठोड यांनी आढावा घेतला.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ