मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री गुरु नानक देव यांना अभिवादन

मुंबई,दि. २७ :- शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
नानकदेव यांचा जन्मोत्सव प्रकाशदिनाच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले.त्यांनी प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव यांची शिकवण दिली. त्यांचा शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. नानकदेव यांच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांचे आयुष्य सदैव उजळून काढत राहील,’ अशा प्रकाशदिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी श्री गुरु नानकदेव यांच्या चरणी कोटी प्रणाम अर्पण केले आहेत.

000