विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’चे प्रदर्शन

0
15

नागपूर, दि. 7 : आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त ‘लोकराज्य’ मासिकाचे प्रदर्शन विधिमंडळ परिसरात लावण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

महासंचालनालयाचे संचालक (माहिती व प्रशासन) हेमराज बागुल, संचालक  (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.

‘लोकराज्य’ मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असून त्यास सात दशकांची परंपरा लाभली आहे. हे मासिक राज्याचा जडणघडणीचा साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, माहितीपूर्ण विशेषांक विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणून लोकराज्य ओळखले जाते. विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरले आहे.

या प्रदर्शनात 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ‘लोकराज्य’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी यावेळी प्रदर्शनाची माहिती दिली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here