‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याची उल्लेखनीय कामगिरी’ या विषयावर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. राज्यातील स्वच्छता प्रेमी, नागरिकांचे योगदान आणि स्वच्छता कामगारांच्या परिश्रमामुळे स्वच्छ भारत अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याबाबत  प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांनी  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांची मुलाखत शनिवार दि. 20 जानेवारी 2024 रोजी प्रसारित होणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.  ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००