मुंबई, दि. २५ : प्रजासत्ताक दिनी वापरले जाणारे प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी व जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर व अंधेरी, बोरिवली तसेच कुर्ला या प्रत्येकी तीन तालुक्यांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय दिनाच्या दिवशी वापरले जाणारे राष्ट्रध्वज, खराब झालेले, माती लागलेले, मैदानात किंवा रस्त्यावर, कार्यक्रमाच्या स्थळी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील कार्यालयात व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटना देण्यात आलेले आहेत, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे तहसीलदार (रजा राखीव) सचिन चौधरी यांनी कळविले आहे.
०००