मुंबई, दि. 25 :- आपल्या साहसपूर्ण कृतीतून अन्य व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल, मानवतावादी कार्यासाठी दिले जाणारे राष्ट्रपतींचे जीवन रक्षक पदक आपल्या राज्यातील आदिका राजाराम पाटील, प्रियंका भारत काळे आणि सोनाली सुनील बालोडे या तीन महिलांना जाहीर झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. राजमाता जिजाऊँ, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याचा, विचाराचा वारसा, महाराष्ट्राच्या लेकी आजही समर्थपणे पुढे नेत आहेत, हे महाराष्ट्राला जाहीर झालेल्या तीन जीवन रक्षा पदकांनी सिद्ध केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी या तीन्ही पदक विजेत्या भगिनींचं कौतुक केले आहे.
०००००