राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतीदिनी विधानभवनात आदरांजली

मुंबई, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतीदिनी विधान भवन येथे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार विधिमंडळाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

००००