मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन २०२३-२४ या वर्षासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या अनुदान योजना ५० हजार रुपये आणि बीज भांडवल योजना रु.५०००१ ते ५ लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. प्रशिक्षण योजना (युवक युवतींना एमसीईडी यांचे मोफत प्रशिक्षण) केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. मार्फत मुदती कर्ज योजना, महिला समृध्दी योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, शैक्षणिक कर्ज योजना यामध्ये स्वदेशी शिक्षण 20 लाखापर्यंत, विदेशी शिक्षण 30 लाखापर्यंत राबविल्या जाणार आहेत. एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मार्फत मुदती कर्ज योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंत, महिला समृध्दी योजना १.४० लाखापर्यंत, लघुऋण वित्त योजना १.४० लाखापर्यंत व महिला अधिकरिता योजना ५ लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
एन.एस.एफ.डी.सी. च्या आकर्षक योजना यामध्ये सुविधा ऋण योजना १० लाखापर्यंत, उत्कर्ष ऋण योजना १० लाख ते ५० लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. नविन शैक्षणिक कर्ज योजना यामध्ये स्वदेशी शिक्षण ३० लाखापर्यंत तर विदेशी शिक्षण ४० लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त पात्र लाभार्थींनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
शैलजा पाटील/विसंअ/