मुंबई, दि. ८ : सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी ४ फेब्रुवारीपासून खानापूर तालुक्यातील विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती विधी व न्याय विभागाच्या विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे नव्याने निर्मित केलेल्या विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील. ४ फेब्रुवारी २०२४ पासून या न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याचे प्रमुख सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/