‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ राज्यात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर; कोकण विभागाने पटकाविले एकूण ५३ पैकी २० पुरस्कार

0
9

ठाणे, दि.09(जिमाका) :- पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे आयोजित “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार” या कार्यक्रमात राज्यातील एकूण 53 उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात 53 पैकी 20 पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात कोकण विभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

कोकण विभागातील उद्योग समूहांना ठाणे-6 (मे. अपर इंडस्ट्रिज लि., मे. कनेक्टवेल इंडस्ट्रिज प्रा.लि., मे.ज्योती स्टील इंडस्ट्रिज, मे. कविश फॅशन प्रा.लि., मे. सचिन्स इम्पेक्स, मे. दलाल प्लास्टिक प्रा.लि.), रत्नागिरी-6 (मे. जिलानी मरीन प्रोडक्ट, मे. कृष्णा ॲन्टी ऑक्सिडन्टस प्रा.लि., मे. अल्काय केमिकल्स प्रा.लि., मे. गद्रे मरीन एक्स्‍पोर्ट प्रा.लि., मे. एम.के.ए. इंजिनियर्स ॲण्ड एक्स्पोर्टर्स प्रा.लि., मे. सुप्रिया लाईफ सायन्स लि.), रायगड-4 (मे.नाईक ओशियन एक्सपोर्टस प्रा.लि., मे. कपूर ग्लास इंडिया प्रा.लि., मे. गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लि., मे. एचकेएस इम्पेक्स, प्रा.लि.), पालघर-3 (मे. खोसला प्रोफिल प्रा.लि., मे. बिक केमिकल्स ॲण्ड पॅकेजिंग प्रा.लि., मे. ईस्टमन केमिकल), सिंधुदूर्ग-1( मे. अमृता कॅश्यू इंडस्ट्रिज) असे मिळून एकूण 20 निर्यात पुरस्कार मिळाले.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत, कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

000000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here