पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक ‍जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटर सिंथेटिक धावन मार्ग, बास्केटबॉल कोर्ट भाड्याने देणे, बॅडमिंटन हॉल सुरू करणे, जलतरण तलावातील फिल्ट्रेशन प्लॅन्ट दुरूस्त करणे, जिल्हा क्रीडा संकुलात सुसज्ज असे 700 खेळाडूंसाठी वसतिगृह तयार करणे याबाबत सविस्तर चर्चा करून संबंधितांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच 700 खेळाडूंसाठी वसतिगृह तयार करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिल्या.  यावेळी मिरज क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा पुरविण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

000000