छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केली कोषागार तपासणी

छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- आर्थिक वर्ष समापनाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा कोषागाराची पाहणी करुन तपासणी केली. जिल्हा कोषागार अधिकारी, सहा. कोषागर अधिकरी संजय धिवर, सचिन अन्नपूर्णे, गणेश केकर्जवालेकर तसेच अन्य सहकारी उपस्थित होते. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या समापनाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कोषागाराच्या सुरक्षा कक्षात सर्व जमा खर्च पाहणी केली. कोषागारात ठेवल्या जाणाऱ्या मुद्रांकादींच्या साठ्याची तपासणी केली. तसेच त्यांच्या नोंदी तपासल्या. जिल्हा कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांना सर्व नोंदी दाखवल्या व माहिती दिली.

०००००