मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

0
5

२६ एप्रिल रोजी मतदान; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

             मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात  मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील  बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदार संघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 16,589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये इटीपीबीएसद्वारे 18,471 सेवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 12 डी अर्जाद्वारे 85 वर्षावरील व  दिव्यांग असे एकूण 14,612 मतदार मतदान करणार आहेत. या आठ मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) 37,403 तर कंट्रोल युनिट (सीयु) 16,589 आणि 16,589 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून दुसऱ्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी आठही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदारसंघनिहाय जनरल निरिक्षक आठ पोलीस निरिक्षक पाच तर खर्च निरिक्षक अकरा नियुक्त करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 22 एप्रिलपर्यंत 49,134 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1057 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 95,250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

        राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 43.96 कोटी एकूण रोख रक्कम तर 34.78 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 88.37 कोटी रुपये, ड्रग्ज 216.47 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 87.84 कोटी रुपये अशा एकूण 471.89 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

26,265 तक्रारी निकाली

16 मार्च ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 3,345 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 3,337 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 26,815 तक्रारीपैकी 26,265 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 122 प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 122 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत.

 

          पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी :

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरूष मतदार मतदान केलेले पुरूष मतदार महिला मतदार मतदान केलेल्या महिला मतदार तृतीयपंथी मतदार मतदान केलेले तृतीयपंथी मतदार एकूण मतदार टक्केवारी
1 9- रामटेक 10,44,891

 

6,66,302

(63.77%)

 

10,04,142

 

5,83,556

(58.11%)

 

52 6 (11.54%)

 

61.00%

 

2 10 – नागपुर 11,13,182

 

6,28,636

(56.47%)

 

1109876

 

578680

(52.14%)

 

223

 

28

(12.56%)

 

54.30%

 

3 11- भंडारा-गोंदिया 9,09,570

 

6,26,275

(68.85%)

 

9,17,604

 

598675

(65.24%)

 

14

 

6

(42.86%)

 

67.04%

 

4 12-गडचिरोली -चिमुर 8,14,763

 

5,95,281

(73.06%)

 

8,02,434

 

5,67,147

(70.68%)

 

10

 

5

(50.00%)

 

71.88%

 

5 13-चंद्रपुर 9,45,736

 

6,58,448

(69.62%)

8,92,122

 

5,83,583

(65.42%)

48

 

11

(22.92%)

67.58%

 दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या तयारीची माहिती खालीलप्रमाणे :

अ.क्र. मतदार संघाचे नाव मतदान केंद्रे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या बॅलेट युनिट (बीयु) कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट
1 05 बुलढाणा 1,962 21 3,924 1,962 1,962
2 06 अकोला 2,056 15 2,056 2,056 2,056
3 07 अमरावती 1,983 37 5,949 1,983 1,983
4 08 वर्धा 1,997 24 3,994 1,997 1,997
5 14यवतमाळ-वाशिम 2,225 17 4,450 2,225 2,225
6 15 हिंगोली 2,008 33 6,024 2,008 2,008
7 16 नांदेड 2,068 23 4,136 2,068 2,068
8 17 परभणी 2,290 34 6,870 2,290 2,290
एकूण 16,589 204 37,403 16,589 16,589

 दुसऱ्या टप्प्यातील मतदारांची संख्या

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण ETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार 85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
1 05 बुलढाणा 9,33,173 8,49,503 24 17,82,700 4,395 2992
2 06 अकोला 9,77,500 9,13,269 45 18,90,814 3,843 2667
3 07 अमरावती 9,44,213 8,91,780 85 18,36,078 2,689 1236
4 08 वर्धा 8,58,439 8,24,318 14 16,82,771 1,521 1784
5 14 यवतमाळ-वाशिम 10,02,400 9,38,452 64 19,40,916 1,545  

1842

6 15 हिंगोली 9,46,674 8,71,035 25 18,17,734 1,348 1348
7 16 नांदेड 9,55,084 8,96,617 142 18,51,843 1,689 945
8 17 परभणी 11,03,891 10,19,132 33 21,23,056 1,441 1798
एकूण 77,21,374 72,04,106 432 1,49,25,912 18,471 14612

 मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र. मतदार संघाचे नाव 2014 मधील मतदार संख्या 2019 मधील मतदार संख्या 2024 मधील मतदार संख्या
1 05- बुलढाणा 15,95,435 17,62,918 17,82,700
2 06 – अकोला 16,72,643 18,65,169 18,90,814
3 07- अमरावती 16,12,739 18,33,091 18,36,078
4 08- वर्धा 15,64,552 17,43,283 16,82,771
5 14- यवतमाळ – वाशिम  

17,55,292

 

19,16,185

19,40,916
6 15 – हिंगोली 15,86,194 17,33,729 18,17,734
7 16 -नांदेड 16,87,057 17,19,322 18,51,843
8 17 -परभणी 18,03,792 19,85,228 21,23,056

       तिसऱ्या टप्प्यातील अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

क्रमांक व मतदारसंघ अंतिम उमेदवारांची संख्या
32-रायगड 13
35-बारामती 38
40-धाराशीव (उस्मानाबाद) 31
41-लातूर 28
42-सोलापुर 21
43-माढा 32
44-सांगली 20
45-सातारा 16
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 9
47-कोल्हापुर 23
48-हातकणंगले 27
एकूण 258

तिसऱ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा अंतिम तपशिल खालीलप्रमाणे :

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण 85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या. मतदान केंद्रे
1 32-रायगड 8,20,605 8,47,763 4 16,68,372 3,146 2,185
2 35-बारामती 12,41,945 11,30,607 116 23,72,668 431 2,516
3 40-धाराशीव (उस्मानाबाद) 10,52,096 9,40,560 81 19,92,737 4,588 2,139
4 41-लातूर 10,35,376 9,41,605 61 19,77,042 2,566 2,125
5 42-सोलापुर 10,41,470 9,88,450 199 20,30,119 2,052 1,968
6 43-माढा 10,35,678 9,55,706 70 19,91,454 2,346 2,030
7 44-सांगली 9,53,024 9,15,026 124 18,68,174 1,859 1,830
8 45-सातारा 9,59,017 9,30,647 76 18,89,740 1,272 2,315
9 46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 7,14,945 7,36,673 12 14,51,630  

3,726

 

1,942

10 47-कोल्हापुर 9,84,734 9,51,578 91 19,36,403 3,103 2,156
11 48-हातकणंगले 9,25,851 8,88,331 95 18,14,277 1,122 1,830
एकूण 1,07,64,741 1,02,26,946 929 2,09,92,616 26,211 23,036

               तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव 2014 मधील मतदार संख्या 2019 मधील मतदार संख्या 2024 मधील मतदार संख्या
1 32-रायगड 15,32,781 16,52,965 16,68,372
2 35-बारामती 18,13,553 21,14,663 23,72,668
3 40-धाराशीव(उस्मानाबाद) 17,59,186 18,89,740 19,92,737
4 41-लातूर 16,86,957 18,86,657 19,77,042
5 42-सोलापुर 17,02,739 18,51,654 20,30,119
6 43-माढा 17,27,322 19,09,574 19,91,454
7 44-सांगली 16,49,107 18,09,109 18,68,174
8 45-सातारा 17,19,998 18,48,489 18,89,740
9 46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 13,67,362 14,55,577 14,51,630
10 47-कोल्हापुर 17,58,293 18,80,496 19,36,403
11 48-हातकणंगले 16,30,604 17,76,555 18,14,277

 चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी, 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु दिनांक 18.04.2024
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक दिनांक 25.04.2024
नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक दिनांक 26.04.2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक दिनांक 29.04.2024
मतदानाचा दिवस दिनांक 13.05.2024

 

        चौथ्या टप्प्यात दि.23 एप्रिल 2024 पर्यंत खालीलप्रमाणे उमेदवार व त्यांची नामनिर्देशने प्राप्त झालेली आहेत.

अ.क्र. मतदार संघाचे नाव उमेदवारांची  संख्या नामनिर्देशनाची संख्या
1 01 नंदुरबार 04 08
2 03 जळगाव 04 05
3 04 रावेर 06 10
4 18 जालना 11 16
5 19 औरंगाबाद 21 27
6 33 मावळ 10 16
7 34 पुणे 16 19
8 36 शिरूर 10 17
9 37 अहमदनगर 10 12
10 38 शिर्डी 06 08
11 39 बीड 13 15
  एकूण 111 153

 

0000

वंदना थोरात/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here