लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४- दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात अंदाजे ६२.७१ टक्के मतदान

मुंबई, दि. २७ : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :  

  • वर्धा : ६४.८५ %
  • अकोला : ६१.७९ %
  • अमरावती : ६३.६७ %
  • बुलढाणा : ६२.०३ %
  • हिंगोली : ६३.५४ %
  • नांदेड : ६०.९४ %
  • परभणी : ६२.२६ %
  • यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %

00000