निवडणूक पोलिस निरीक्षक गौरव शर्मा यांनी केली सुरक्षा कक्षाची पाहणी

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठीचे पोलिस निरीक्षक गौरव शर्मा यांनी मतदारसंघातील सुरक्षा कक्षाची पाहणी केली.

श्री. शर्मा हे भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी असून ते अतिरिक्त पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांनुसार पोलिस निरीक्षक श्री. शर्मा यांनी सुरक्षा कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेसाठी प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या योग्य सुरक्षा व्यवस्थेच्या  तयारीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी संबंधित सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना अन्य सूचनाही केल्या.

0000