ठाणे, दि.06 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे यातीनही निरीक्षकांना भेटण्याची वेळ व स्थळ जाहीर करण्यात आले आहे.
24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक म्हणून श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक म्हणून कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल झाले असून .
निरीक्षकांना भेटण्याची वेळ
सर्वसाधारण निरीक्षक श्री. जैन (आयएएस) यांचा संपर्क क्रमांक 8779033945 व 0251-2990725 असा असून genobserver24kalyan@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे. त्यांचा सध्याचा राहण्याचा पत्ता यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), असा आहे. श्री.जैन यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, पेंढारकर कॉलेजजवळ, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.
केंद्रीय खर्च निरीक्षक श्री.नकुल अग्रवाल (आयआरएस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, पेंढारकर कॉलेजजवळ, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. अग्रवाल यांचा मतदारसंघातील संपर्क क्रमांक 8369751654 असा असून expobs24kalyan@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे.
तर पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) यांचा संपर्क क्रमांक 8591173368 हा असून ilakkiyaips12@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे. कु.करुणागरन यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.
00000000000