मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. शनिवार 11 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार दत्ता देशमुख यांनी घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध केलेली कार्यवाही याविषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री. ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ/