मतदानासाठी यंत्रणा सज्ज; मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

  • चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान ; 23 हजार 284 मतदान केंद्र
  • सुमारे 2 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
  • तिसऱ्या टप्प्यात सरासरी 63.55 टक्के मतदान
  • विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर  

मुंबई, दि. १० : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान होत असून असून निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूककरिता लागणारे साहित्य, साधनसामुग्री मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव (उस्मानाबाद), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान घेण्यात आले. तिसऱ्या टप्पात एकूण सरासरी 63.55 टक्के मतदान झाले.

चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

यासाठी एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ५३,९५९ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,२८४ आणि २३,२८४ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात एकूण 78 हजार 460 शस्त्र परवाने वितरीत करण्यात आली आहेत. त्यापैकी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थांतर्गत 9 मे पर्यंत 50,831 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे.  परवाने रद्द करून 1,132 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,851  इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,22,834 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 9 मे  2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 59.29 कोटी रोख रक्कम तर 45.72 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 162.40 कोटी रुपये, ड्रग्ज 244.59 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत १०१.६६ कोटी रुपये अशा एकूण ६१४.१४ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४१,१३४ तक्रारी निकाली

16 मार्च ते 9 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ५४३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ५४१५ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ४१,९६५ तक्रारीपैकी ४१,१३४ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समितीमार्फत जाहिरातीच्या पूर्वप्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 236 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर  

भारत निवडणूक आयोगाच्या 8 मे रोजीच्या प्रसिद्धीपत्रानुसार राज्यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे मुंबई व कोकण विभाग असे दोन पदवीधर मतदार संघ आणि नाशिक विभाग व मुंबई असे दोन शिक्षक मतदार संघ याकरिता द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे.  या कार्यक्रमानुसार बुधवार, 15 मे रोजी अधिसूचना निर्गमित करणे,  नामनिर्देशनाची शेवटची तारीख 22 मे, नामनिर्देशन पत्राची छाननी 24 मे  रोजी होईल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख 27 मे अशी आहे. तर 10 जून रोजी सकाळ 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर 13 जून रोजी मतमोजणी करण्यात येईल.

तिसरा टप्पा:-

तिसऱ्या टप्प्यातील कोकण विभागातील 02 आणि पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात दि.07.05.2024 रोजी मतदान घेण्यात आलेले असून मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरूष मतदार मतदान केलेले पुरूष मतदार महिला मतदार मतदान केलेल्या महिला मतदार तृतीयपंथी मतदार मतदान केलेले तृतीयपंथी मतदार एकूण मतदार टक्केवारी
1 32-रायगड 8,20,605 4,58,629

(55.89%)

8,47,763 4,67,561

(55.15%)

04 00

(00.00%)

60.51%%
2 35-बारामती 12,41,945

 

7,74,383

(62.35%)

1130607

 

6,37,219

(56.36%)

116 19

(16.38%)

59.50%

 

3 40-धाराशीव (उस्मानाबाद) 10,52,096

 

6,90,533

(65.63%)

9,40,560 5,82,416

(61.92%)

81 20

(24.69%)

63.88%
4 41-लातूर 10,35,376

 

6,64,630

(64.19%)

9,41,605 5,72,700

(60.82%)

61 25

(40.98%)

62.59%

 

5 42-सोलापुर 10,41,470

 

6,45,015

(61.93%)

9,88,450

 

5,56,515

(56.30%)

199

 

56

(28.14%)

59.19%

 

6 43-माढा 10,35,678

 

6,90,054

(66.63%)

9,55,706

 

5,77,446

(60.42%)

70

 

30

(42.86%)

63.65%

 

7 44-सांगली 9,53,024

 

6,22,054

(65.27%)

9,15,026

 

5,41,267

(59.15%)

124

 

32

(25.81%)

62.27%

 

8 45-सातारा 9,59,017

 

6,22,414

(64.90%)

9,30,647

 

5,69,432

(61.19%)

76

 

23

(30.26%)

63.07%

 

9 46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 7,14,945

 

4,59,104

(64.21%)

7,36,673

 

4,48,513

(60.51%)

12

 

01

(09.09%)

62.52%

 

10 47-कोल्हापुर 9,84,734

 

7,24,734

(73.60%)

9,51,578

 

6,61,457

(69.51%)

91

 

39

(42.86%)

71.59%

 

11 48-हातकणंगले 9,25,851

 

6,78,590

(73.15%)

8,88,331

 

6,11,453

(68.72%)

95

 

30

(57.78%)

71.11%

 

चौथा टप्पा:-

चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी व 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.   त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव मतदान केंद्रे क्रिटीकल मतदान केंद्रे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या बॅलेट युनिट (बीयु) कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट
1 01 नंदुरबार 2,115 06 11 2115 2,115 2,115
2 03 जळगाव 1,982 02 14 1982 1,982 1,982
3 04 रावेर 1,904 01 24 3808 1,904 1,904
4 18 जालना 2,061 13 26 4122 2,061 2,061
5 19 औरंगाबाद 2,040 20 37 6120 2,040 2,040
6 33 मावळ 2,566 08 33 7698 2,566 2,566
7 34 पुणे 2,018 10 35 6054 2,018 2,018
8 36 शिरूर 2,509 01 32 7527 2,509 2,509
9 37 अहमदनगर 2,026 01 25 4052 2,026 2,026
10 38 शिर्डी 1,708 04 20 3416 1,708 1,708
11 39 बीड 2,355 17 41 7065 2,355 2,355
एकूण 23,284 83 298 53,959 23,284 23,284

 

मतदारांची संख्या

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण 85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
1 01 नंदुरबार 9,92,971 9,77,329 27 19,70,327 2505
2 03 जळगाव 10,37,350 9,56,611 85 19,94,046 1250
3 04 रावेर 9,41,732 8,79,964 54 18,21,750 888
4 18 जालना 10,34,106 9,33,416 52 19,67,574 1562
5 19 औरंगाबाद 10,77,809 9,81,773 128 20,59,710 1002
6 33 मावळ 13,49,184 12,35,661 173 25,85,018 321
7 34 पुणे 10,57,870 10,03,082 324 20,61,276 514
8 36 शिरूर 13,36,820 12,02,679 203 25,39,702 490
9 37 अहमदनगर 10,32,946 9,48,801 119 19,81,866 824
10 38 शिर्डी 8,64,573 8,12,684 78 16,77,335 834
11 39 बीड 11,34,284 10,08,234 29 21,42,547 410
एकूण 1,18,59,645 1,09,40,234 1,272 2,28,01,151 10,600

 

             चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूक करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्य बळाचे रॅन्डमाझेशन करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅन्डमाझेशन झाले आहे.

या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनींग करण्यात येत आहे.  संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इपीक (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे.

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.   चौथ्या टप्प्यातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलेन्स पिरियड (Silence Period) आहे.  सबब सदर लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश  आहेत.

एकंदरीत राज्यातील चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

पाचवा टप्पा:-

पाचव्या टप्प्यात 02 धुळे, 20 दिंडोरी, 21 नाशिक, 22 पालघर, 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे, 26 मुंबई उत्तर, 27 मुंबई उत्तर-पश्चिम, 28 मुंबई उत्तर-पूर्व, 29 मुंबई उत्तर-मध्य, 30 मुंबई दक्षिण-मध्य, 31 मुंबई दक्षिण  अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 06.05.2024 असा होता. त्यानुसार अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव अंतिम उमेदवारांची  संख्या
1 02 धुळे 18
2 20 दिंडोरी 10
3 21 नाशिक 31
4 22 पालघर 10
5 23 भिवंडी 27
6 24 कल्याण 28
7 25 ठाणे 24
8 26 मुंबई उत्तर 19
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 21
10 28 मुंबई उत्तर-पूर्व 20
11 29 मुंबई उत्तर-मध्य 27
12 30 मुंबई दक्षिण-मध्य 15
13 31 मुंबई दक्षिण 14
एकूण 264

 

पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा अंतिम तपशील खालीलप्रमाणे आहे :-

 

 

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण मतदान केंद्रे
1 02 धुळे 10,51,928 9,70,086 47 20,22,061 1,969
2 20 दिंडोरी 9,60,332 8,93,038 17 18,53,387 1,922
3 21 नाशिक 10,59,048 9,70,996 80 20,30,124 1,910
4 22 पालघर 11,25,209 10,23,080 225 21,48,514 2,263
5 23 भिवंडी 11,29,714 9,57,191 339 20,87,244 2,189
6 24 कल्याण 11,17,414 9,64,021 786 20,82,221 1,955
7 25 ठाणे 13,48,163 11,59,002 207 25,07,372 2,448
8 26 मुंबई उत्तर 9,68,983 8,42,546 413 18,11,942 1,701
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 9,38,365 7,96,663 60 17,35,088 1,753
10 28 मुंबई उत्तर-पूर्व 8,77,855 7,58,799 236 16,36,890 1,681
11 29 मुंबई उत्तर-मध्य 9,41,288 8,02,775 65 17,44,128 1,696
12 30 मुंबई दक्षिण-मध्य 7,87,667 6,86,516 222 14,74,405 1,539
13 31 मुंबई दक्षिण 8,32,560 7,03,565 43 15,36,168 1,527
एकूण 1,31,38,526

 

1,15,28,278

 

2,740

 

2,46,69,544

 

24,553

 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :- पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव 2014 मधील मतदार संख्या 2019 मधील मतदार संख्या 2024 मधील मतदार संख्या
1 02 धुळे 16,75,367 19,08,173 20,22,061
2 20 दिंडोरी 15,30,208 17,32,936 18,53,387
3 21 नाशिक 15,93,774 18,85,064 20,30,124
4 22 पालघर 15,78,149 18,85,600 21,48,514
5 23 भिवंडी 16,98,584 18,90,100 20,87,244
6 24 कल्याण 19,22,034 19,65,676 20,82,221
7 25 ठाणे 20,73,251 23,70,903 25,07,372
8 26 मुंबई उत्तर 17,83,870 16,47,350 18,11,942
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 17,75,416 17,32,263 17,35,088
10 28 मुंबई उत्तर-पूर्व 16,68,357 15,88,693 16,36,890
11 29 मुंबई उत्तर-मध्य 17,37,084 16,79,891 17,44,128
12 30 मुंबई दक्षिण-मध्य 14,47,866 14,40,380 14,74,405
13 31 मुंबई दक्षिण 14,85,844 15,54,176 15,36,168

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्र मतदार संघाचे नाव 18-19 20-29 30-39 40-49 50-59 60-69 70-79 80 +
1 02 धुळे 28,223  3,87,813 4,50,442 4,71,317 3,10,938 2,04,467 1,09,407 59,454
2 20 दिंडोरी 35,795 3,82,951 4,15,971 4,12,006 2,76,249 1,82,941 97,631 49,843
3 21 नाशिक 28,759 3,64,979 4,78,911 4,69,698 3,26,220 2,03,661 1,06,841 51,055
4 22 पालघर 25,525 4,12,244 5,03,095 4,89,401 3,66,497 2,12,067 98,721 40,964
5 23 भिवंडी 39,307 3,99,536 5,03,065 4,81,359 3,42,251 1,97,817 88,182 35,727
6 24 कल्याण 29,603 3,31,454 5,00,530 4,93,465 3,67,732 2,20,911 99,945 38,581
7 25 ठाणे 37,056 3,85,505 5,71,273 6,07,817 4,49,554 2,73,831 1,30,428 51,908
8 26 मुंबई उत्तर 22,929 2,57,010 3,67,097 4,13,478 3,45,218 2,36,530 1,23,475 46,205
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 18,972 2,43,919 3,52,408 3,97,421 3,38,354 2,17,870 1,15,061 51,083
10 28 मुंबई उत्तर-पूर्व 18,507 2,37,922 3,54,321 3,87,564 3,05,579 1,95,948 1,01,716 35,333
11 29 मुंबई उत्तर-मध्य 19,189 2,40,581 3,53,007 4,01,070 3,39,570 2,14,904 1,16,291 59,516
12 30 मुंबई दक्षिण-मध्य 15,802 2,09,436 3,11,379 3,38,984 2,81,826 1,81,431 94,550 40,997
13 31 मुंबई दक्षिण 15,876 1,78,818 2,74,638 3,36,183 3,12,456 2,17,276 1,28,574 72,347
          एकूण 3,35,543

 

40,32,168

 

54,36,137

 

56,99,763

 

43,62,444

 

27,59,654

 

14,10,822

 

6,33,013

 

 

पाचव्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघ General Observer Police Observer Expenditure Observer
02 धुळे 1 1 1
20 दिंडोरी 1 1 2
21 नाशिक 1 2
22 पालघर 1 1 1
23 भिवंडी 1 1
24 कल्याण 1 1 1
25 ठाणे 1 2
26 मुंबई उत्तर 1 1 2
27 मुंबई उत्तर-पश्चिम 1 2
28 मुंबई उत्तर-पूर्व 1 1 1
29 मुंबई उत्तर-मध्य 1 1
30 मुंबई दक्षिण-मध्य 1 1 1
31 मुंबई दक्षिण 1 1
एकूण 13 07 18

 

राज्याची माहिती:-

1)  Law and Order (कायदा व सुव्यवस्था): दिनांक   09.05.2024  पर्यंतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. तपशील संख्या
1. राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने 78,460
2. जमा करण्यात आलेली शस्रास्रे 50,831
3. जप्त करण्यात आलेली शस्रे 237
4. जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रात्रे 1,851
5. परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे 1,132
6. परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे 17,676
7. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या इसमांची संख्या 1,22,834

 

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती :-

        राज्यामध्ये 01.03.2024 ते दि. 09.05.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातू इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. जप्तीची बाब परिमाण रक्कम (कोटी मध्ये)
1 रोख रक्कम 59.29
2 दारु 58,34,106 लिटर 45.72
3 ड्रग्ज 18,57,130 ग्राम 244.59
4 मौल्यवान धातू 22,06,705  ग्राम 162.40
5 फ्रिबीज 51,284  (संख्या) 0.47
6 इतर 73,18,009  (संख्या) 101.66
  एकूण 614.14

         दि. 16 मार्च ते 9 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सीव्हिजील (C-Vigil) ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या             5433 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 5415 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टल (NGSP Portal) वरील  41,965 तक्रारीपैकी 41,134 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समिती:- राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्यासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 236 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका :-

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 8 मे च्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे मुंबई व कोकण विभाग असे दोन पदवीधर मतदार संघ आणि नाशिक विभाग व मुंबई असे दोन शिक्षक मतदार संघ याकरिता द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. :-

 

अ.क्र. कार्यक्रमाचा तपशील दिनांक
1 अधिसूचना निर्गमित करणे बुधवार, दि.15 मे, 2024
2 नामनिर्देशनाचा शेवटचा दिनांक बुधवार, दि.22 मे, 2024
3 नामनिर्देशन पत्राची छाननी शुक्रवार, दि.24 मे, 2024
4 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक सोमवार, दि.27 मे, 2024
5 मतदानाचा दिनांक सोमवार, दि.10 जून, 2024
6 मतदान करण्याचा कालावधी सकाळी 08.00 ते दुपारी 04.00
7 मतमोजणीचा दिनांक गुरुवार, दि.13 जून, 2024
8 निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक मंगळवार, दि.18 जून, 2024

०००००

दत्तात्रय कोकरे, पवन राठोड /विसंअ