मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्राधान्याने मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

0
11
  • मतदारांसाठीच्या सुविधांचा लाभ घ्यावा
  • पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान ; 24 हजार 579 मतदान केंद्र
  • सुमारे 2 कोटी 46 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
  • चौथ्या टप्प्यात सरासरी 62.21 टक्के मतदान

मुंबई, दि. 17 :- राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान होत असून यामध्ये सर्व पात्र मतदारांनी प्राधान्याने आपल्या मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये 62.21 टक्के मतदान  झाले. 2019 च्या तुलनेत या आकडेवारीत एक टक्क्याने वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

आपले नाव मतदार यादी शोधा सहजतेने

मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आयोगामार्फत वर्षभर सुरु राहत असून पाचव्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदार यादीत 22 एप्रिल 2024 पर्यंत नाव नोंदणी केलेल्या सर्व मतदारांची यादी ऑनलाईन उपलब्ध असून यादीत नाव असलेल्यांना मतदान करता येणार आहे. मतदारांना विनासायस मतदान केंद्र, मतदान यादीतील आपले नाव याची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत व्होटर हेल्पलाईन ॲप तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर व्होटर पोर्टल याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये मतदारांनी आपल्या मतदार नोंदणी अर्जामध्ये दिलेल्या प्राथमिक माहितीचा तपशील भरल्यावर त्यांना आपले नाव कुठल्या मतदान केंद्रावर, मतदार यादीत कितव्या क्रमांकावर आहे याची माहिती उपलब्ध होते. जे मतदार या दोन्ही सुविधांचा लाभ घेवू शकत नाही त्यांच्यासाठी व्होटर हेल्पलाईन 1950 या क्रमांकावर देखील सुविधा उपलब्ध आहे. मतदानापूर्वी आवर्जून या सुविधांचा लाभ घेवून मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच ही माहिती घेतल्यास त्यांना अधिक सुलभतेने मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच ज्या मतदारांनी आपला मोबाईल क्रमांक मतदार नोंदणी अर्जासोबत जोडलेला आहे त्यांना तो नंबर टाकून किंवा मतदार ओळखपत्राचा दहा अंकी क्रमांक टाकून देखील आपले नाव शोधता येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगामार्फत घरपोच मतदान चिठ्ठी वितरीत करण्यात येत आहे. मात्र ही चिठ्ठी कुठल्याही प्रकारे मतदार ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही.

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण २४ हजार ५७९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या तेरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४१,८९७ तर कंट्रोल युनिट (सीयु) २४,५७९ आणि २४,५७९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्र परिसरात १०० मिटरच्या आत भ्रमणध्वनी यंत्रणा (मोबाईल) नेण्यास निर्बंध आहे.

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी तेराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थांतर्गत 15 मे पर्यंत 50,970 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे.  परवाने रद्द करून 1,136 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,976 इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,27,837 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  राज्यामध्ये 1 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 74.35 कोटी रोख रक्कम तर 48.36 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 185.55 कोटी रुपये, ड्रग्ज 264.69 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत १०५.५३ कोटी रुपये अशा एकूण ६७८.९७ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४८,४९० तक्रारी निकाली

16 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ६३८५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ६३७८ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ४९,५४३ तक्रारीपैकी ४८,४९० निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

 चौथ्या टप्प्यातील नाशिक विभागातील 05 आणि पुणे विभागातील 03 व औेरंगाबाद विभागातील 03 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात दि.13.05.2024 रोजी मतदान घेण्यात आलेले असून मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरूष मतदार मतदान केलेले पुरूष मतदार महिला मतदार मतदान केलेल्या महिला मतदार तृतीयपंथी मतदार मतदान केलेले तृतीयपंथी मतदार एकूण मतदार टक्केवारी
1 01 नंदुरबार 9,92,971 7,23,097

(72.82%)

9,77,329 6,69,528

(68.51%)

27 10

(37.04%)

70.68%
2 03 जळगाव 10,37,350 6,28,123

(60.55%)

9,56,611 5,37,827

(56.22%)

85 18

(21.18%)

58.47%

 

3 04 रावेर 9,41,732 6,21,983

(66.05%)

8,79,964 5,48,950

(62.38%)

54 11

(20.37%)

 64.28%
4 18 जालना 10,34,106 7,35,880

(71.16%)

9,33,416 6,25,335

(66.99%)

52 11

(21.15%)

69.18%

 

5 19 औरंगाबाद 10,77,809 7,09,131

(65.79%)

9,81,773 5,89,055

(60.00%)

128 41

(32.03%)

63.03%

 

6 33 मावळ 13,49,184 7,77,742

(57.65%)

12,35,661 6,40,651

(51.85%)

173 46

(26.59%)

54.87%

 

7 34 पुणे 10,57,877 5,84,511

(55.25%)

10,03,075 5,19,078

(51.75%)

324 89

(27.47%)

53.54%

 

8 36 शिरूर 13,36,820 7,73,969

(57.90%)

12,02,679 6,01,591

(50.02%)

203 33

(16.26%)

54.16%

 

9 37 अहमदनगर 10,32,946 7,21,327

(69.83%)

9,48,801 5,98,790

(63.11%)

119 51

(42.86%)

66.61%

 

10 38 शिर्डी 8,64,573 5,80,236

(67.11%)

8,12,684 4,77,028

(58.70%)

78 34

(43.58%)

63.03%

 

11 39 बीड 11,34,284 8,31,245

(73.29%)

10,08,234 6,88,270

(68.27%)

29 08

(35.51%)

70.92%

 

चौथ्या टप्प्यातील 11 मतदार संघामध्ये एकूण 62.21 टक्के मतदान झालेले आहे.

पाचव्या टप्प्यात 02 धुळे, 20 दिंडोरी, 21 नाशिक, 22 पालघर, 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे, 26 मुंबई उत्तर, 27 मुंबई उत्तर-पश्चिम, 28 मुंबई उत्तर-पुर्व, 29 मुंबई उत्तर-मध्य, 30 मुंबई दक्षिण-मध्य व 31 मुंबई दक्षिण अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव मतदान केंद्रे क्रिटीकल मतदान केंद्रे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या बॅलेट युनिट (बीयु) कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट
1 02 धुळे 1,969 14 18 3,938 1,969 1,969
2 20 दिंडोरी 1,922 04 10 1,922 1,922 1,922
3 21 नाशिक 1,910 06 31 3,820 1,910 1,910
4 22 पालघर 2,270 05 10 2,270 2,270 2,270
5 23 भिवंडी 2,191 06 27 4,382 2,191 2,191
6 24 कल्याण 1,960 00 28 3,920 1,960 1,960
7 25 ठाणे 2,453 01 24 4,906 2,453 2,453
8 26 मुंबई उत्तर 1,702 30 19 3,404 1,702 1,702
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 1,753 21 21 3,506 1,753 1,753
10 28 मुंबई उत्तर-पुर्व 1,682 32 20 3,364 1,682 1,682
11 29 मुंबई उत्तर-मध्य 1,698 30 27 3,396 1,698 1,698
12 30 मुंबई दक्षिण-मध्य 1,539 00 15 1,539 1,539 1,539
13 31 मुंबई दक्षिण 1,530 11 14 1,530 1,530 1,530
एकूण 24,579 160 264 41,897 24,579 24,579

मतदारांची संख्या

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण 85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
1 02 धुळे 10,51,928 9,70,086 47 20,22,061 2,015
2 20 दिंडोरी 9,60,332 8,93,038 17 18,53,387 1,237
3 21 नाशिक 10,59,048 9,70,996 80 20,30,124 828
4 22 पालघर 11,25,209 10,23,080 225 21,48,514 876
5 23 भिवंडी 11,29,714 9,57,191 339 20,87,244 522
6 24 कल्याण 11,17,414 9,64,021 786 20,82,221 558
7 25 ठाणे 13,48,163 11,59,002 207 25,07,372 3,443
8 26 मुंबई उत्तर 9,68,983 8,42,546 413 18,11,942 639
9 27 मुंबई उत्तर-पश्चिम 9,38,365 7,96,663 60 17,35,088 1,544
10 28 मुंबई उत्तर-पूर्व 8,77,855 7,58,799 236 16,36,890 191
11 29 मुंबई उत्तर-मध्य 9,41,288 8,02,775 65 17,44,128  

1,026

12 30 मुंबई दक्षिण-मध्य 7,87,667 6,86,516 222 14,74,405  

2,154

13 31 मुंबई दक्षिण 8,32,560 7,03,565 43 15,36,168 3,035
एकूण 1,31,38,526

 

1,15,28,278

 

2,740

 

2,46,69,544

 

18,068

00000

वंदना थोरात/स.सं, पवन राठोड/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here