मुंबई, दि.१८ : परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहनचालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहनचालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.
ज्या उमेदवारांची पक्क्या परवाण्याकरिता वाहनचालक चाचणी २० मे २०२४ रोजी होती, ती दि.२१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात (Re-schedule) करण्यात आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (SMS) देखील पाठविण्यात आले आहेत.
तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास, त्या सर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी. संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000