मुंबई, दि. १२ :- मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रथम प्रशिक्षण १४ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ९:०० ते दुपारी १:३० यावेळेत मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले रेल्वे स्टेशनजवळ, विलेपार्ले पूर्व मुंबई ४०००५७ येथे हे प्रशिक्षण होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्ह्यांतील मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र.१, २, व ३ चे आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.
——000——–