विधानपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४: मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर           

0
11

मुंबई, दि. 20 :- लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५-ब नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्यानेत्यांना मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर केलेली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्त‍िक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधानपरिषदेच्या कोकण विभाग व मुंबई पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

या निवडणुकीसाठीचे मतदान २६ जून२०२४ (बुधवार) रोजी सकाळी ७.०० ते सायं ६,०० पर्यंत व मतमोजणी ०१ जुलै२०२४ (सोमवार) रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here