राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि.२६ :  सामाजिक क्रांतीचे  उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज  विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, सुरेश मोगल, उपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000