मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
मतदानाची ६ वाजेपर्यंतची आकेडवारी पुढीलप्रमाणे –
कोकण पदवीधर मतदारसंघ मतदानाची सायंकाळी ६ वाजेपर्यंतची टक्केवारी ६३.०० टक्के इतकी आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ५६.०० टक्के इतकी आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघ सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ७५.०० इतकी आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ९३.४८ टक्के इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.