मुंबई, दि. २ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले.
महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० असावे. कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. व्यक्तीनी महामंडळाच्या Wwww.vjnt.in या संकेत स्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी गृहनिर्माण भवन, खो.क्र. ३३. कलानगर, बांद्र (पू.), मुंबई या पत्त्यावर तर दूरध्वनी क्र. ०२२ ३१६९१८१५ येथे संपर्क साधावा, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.