सिंधुदुर्ग, दि. ७ (जिमाका) : जर्मनी देशाला कुशल मन्युष्यबळ आवश्यक आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याने त्याची गरज भारत पूर्ण करू शकतो. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून जर्मनीमध्ये भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे . जर्मन भाषा प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण कालावधीमध्ये जर्मन भाषेतच बोलावे . प्रशिक्षण घेवून जर्मनीला जाणारी पहिली तुकडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार, याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले .
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, ग्योथे संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित जर्मनी देशाला कुशल मनुष्यबळ पुरविणे (पथदर्शी अभ्यास) अंतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे पार पडला . दीप प्रज्वलन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सुरज मांढरे, एससीईआरटी पुणे चे संचालक राहुल रेखावार, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार ,मार्कुस बिशेल संचालक ग्योथे संस्था पुणे, श्रीम.अलिसिया पाद्रोस,उपसंचालक ग्योथे संस्था पुणे,श्रीम. मुक्ता गडकरी ग्योथे संस्था विभाग प्रमुख मुंबई, श्रीम.श्रुती नायगावकर प्रकल्प समन्वयक ग्योथेसंस्था पुणे, ओंकार कलवडे जर्मन भाषा संपर्क अधिकारी, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, भोसले नॉलेज सिटी कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले सिंधुदुर्ग डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, सिंधुदुर्ग योजना शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत कमळकर योजना डाएट वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी , पालक व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एससीईआरटी, पुणेचे संचालक राहूल रेखावार यांनी केले. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, संचालक ग्योथे संस्था पुणे मार्कुस बिशेल यांनी मनोगत व्यक्त केले.
विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी आभार मानले . सूत्र संचालन अमर प्रभू यांनी केले.
0000